जिल्हा

वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड

वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड
वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड फोटो: ठाणे वैभव

कल्याण : कल्याण पूर्व, नांदिवली येथील जय बजरंग कुस्ती आखाड्याची युवा कुस्तीपटू वैष्णवी पाटील हिची २३ वर्षांखालील वरिष्ठ जागतिक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी ६५ किलो फ्रीस्टाइल गटातून भारतीय संघात निवड झाली आहे. अमेरिकेतील लास वेगास येथे 12 ते 18 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत वैष्णवी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण व उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘शिवसेना विथ जेन झी’ उपक्रमाच्या माध्यमातून वैष्णवी पाटीलचा सत्कार करण्यात आला. चिंचपाडा शिवसेना विभागाच्या वतीने शिवसैनिक दुर्गेश बागुल आणि संतोष माने यांनी तिचा गौरव करून आगामी जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

वैष्णवीच्या यशामागे कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, हाडवैद्य वसंत साळुंखे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रज्वलदीप ढोणे, नांदोली गावचे माजी सरपंच विलास ढोणे, शिवसैनिक श्वेता  ढोणे, समाजसेवक पंकज ढोणे आणि गणेश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475